Tuesday, 15 December 2015

काही तरी चुकतंय …

सगळं आलबेल आहे.
गिळायला अन्न, हाताला काम, राहायला घर आहे … पण काय माहित का तर,
काही तरी चुकतंय…

रोज बघावं आरशात तर छान view दिसतो, सोबतीला cosmetics चा लवाजमाहि असतो…
या टापटीप चेहऱ्यावर हसू असलं, तरी मनात काहीतरी सलतंय … काय माहित का तर,
काही तरी चुकतंय…

बोलावं कि नको - मन आणि डोकं भांडतायत,
बोलल्यावर  बघितलं ना काय झालं ? असा प्रश्न करून  डोकं मनाला गप्प करतंय…
काय माहित का तर … पण काहीतरी चुकतंय…

कुणाचं काही बिघडवलं नाही मी, मग  माझ्याच वाट्याला का हे सगळं येतंय
मी माझी मज्जेत असते - हेच का या जुलमी लोकांना सलतंय ?
राग या परक्यांचा आपल्यांवरच  काढतेय … काय माहित का तर,
काही तरी चुकतंय…

बदलावं बदलावं म्हणून स्वभावाला अंकुश लावलेत , नंतर त्रास नको म्हणून आधीच काही लोक दूर सारलेत
ती वाट वाकडी म्हणून रस्ते हि बदलले, politically correct राहावं म्हणून असं काय काय चाललंय …
(म्हणूनच कि काय ?) पण तरीही …
काय माहित का तर … काहीतरी चुकतंय …

जगतांना जगून घ्यावं - आजचा दिवस शेवटचा असं  समजून चालावं
मनमोकळ हसावं आणि ढसाढसा रडावं
कळतंय सगळं ..  अगदी सगळं. तरीही घोडं कुठे अडतंय …
काय माहित का तर … पण राव, काही तरी चुकतंय …  काहीतरी चुकतंय …









5 comments:

  1. bhut aani bhavishyachyi chinta dokyat
    asthir aani chanchal man kuthun kuthe eka jhokyaat
    aajchya yaa kshanaacha aanand ghenach aamach muktay

    kaay maahit kaa tar... pan kharach kaahitari chuktay


    chaan lihites, keep it up

    ReplyDelete
  2. kya baat!!

    Aaj ya shishye la guru milala asa wattay ... war lihilay khara- pan ata asa wattay - kuthe kay chuktay? :D

    ReplyDelete
  3. कविता आवडली!
    अनुभवला येणाऱ्या भावनांचा प्रामाणिकपणा हे तुझ्या लिखाणाचं मुख्य वैशिष्ठ्य! त्यामुळेच ही कविता वाचकाच्या मनाशी थेट संवाद साधणारी झाली आहे. तरी 'नेमकं काय चुकतंय' याचा थोडा अंदाज लावता येऊ शकतो. भौतिक साधन-संपत्तीत गुंतलेलं आधुनिक जीवन, त्यामुळे प्रसंगी मानवाच्या मानवाशी असलेल्या नातेसंबंधात आलेली कृत्रिमता आणि कडवटपणा, त्यामुळे व्यक्तीची (Individual) होणारी घुसमट आणि होणारा त्रागा यामुळे मनाला विषण्ण करणारी अस्वस्थता यांचं चित्रण अत्यंत परिणामकारकरित्या तू या कवितेतनं केलेलं आहेस. तू म्हटल्याप्रमाणे "कळतंय सगळं .. अगदी सगळं. तरीही घोडं कुठे अडतंय …" याचा अर्थ मी माझ्या कुवतीप्रमाणे लावला. माझ्यामते ते कळत असावं पण जे कळतंय ते फार सैरभैर असावं, त्याला नेमकं शब्दांत किंवा संज्ञांत बद्ध करणं (To coin into a phrase) यातंच घोडं अडत असावं. असो. अशीच लिहित रहा. शुभेच्छा, अभिनंदन आणि धन्यवाद!

    ReplyDelete
    Replies
    1. अनिरुद्ध, तुझ्या अमुल्य अभिप्राया बद्दल खूप खूप आभार !
      माझ्या एका favorite movie मधील dialogue - "कविता हि समजायची नसतेच - समजायच्या असतात त्या भावना..."
      तू त्या भावना समजून घ्यायचा प्रयत्न केलास आणि बर्याच अंशी सफलहि झालास ...
      खर तर कविता हा माझा प्रांत नव्हेच , पण तरीही लिहून बरं वाटलं - आणि ते समोरच्या पर्यंत पोहोचलंय हे बघून आणखी बरं वाटलं :) आपली कृपादृष्टी अशीच राहावी हि आशा करते :) ... धन्यवाद

      Delete
  4. Khup chan vatale vachun khup chan

    ReplyDelete