Monday, 17 June 2013

नव्याने सुरुवात...

                                                         । । श्री गणेशाय नमः । । 
 
आज बर्याच दिवसांनी असा वेळ मिळाला… स्वतःसाठी…
विचारांना लेखणीची साथ कित्येक दिवसांपासून मिळाली नव्हती…
खरंतर आपण म्हणतोच फक्त… आजकाल लोक स्वतःसाठीच जगतात , स्वतःचाच विचार करतात , बाकी जगाशी काही एक देणं घेणं नसतं  त्यांना… पण खरंच असं आहे का?
स्वतःसाठी तरी कुठे वेळ असतो आपल्याला… नुसतंच घड्याळाच्या काट्यावर आणि पैश्याच्या मागावर पायपीट करणारे आपण…  जगतो कुठे?… स्वतःसाठी काय नि कोणासाठी काय… अर्थात अपवाद आहेतच यालाही . . 'सन्माननीय अपवाद ' म्हणणं जास्त योग्य होईल !

असो… वेळ मिळाला (कि काढला?), ते महत्वाचं … हातात लेखणी नाही पण keyboard ने तर आणखीच सोय केलीय . आता हस्ताक्षर उर्फ Handwriting कशी आहे याचीही चिंता नाही! लिहित जायचं… बस… मनात आलं  ते… शब्दाच्या होडीवर अशी बर्याच दिवसांनी सैर करायला मिळतेय… छान वाटतंय…

विचार आणि लेखणीच नातं पण काय गमतीचं आहे नं? विचार हे जोपर्यंत विचारच असतात, तोपर्यंत त्यांना हवं तसं वळवता येतं… त्यांना कृतीत उतरवायचं कि नुसतंच सोडून द्यायचं हे पण आपल्या हातात असतं… हे जरी खरं  असलं तरी आपण विचारांना वळवण्या ऐवजी तेच आपल्याला नाचवत असतात कायम … पण त्यांना असं लेखणीत कैद केलं कि कधी कधी प्रेमात पडायला होतं  या विचारांच्या… कधीतरी काहीतरी लिहिलेलं, नंतर कधीतरी वाचताना जी मजा येते, जे समाधान मिळतं ते शब्दात सांगणं कठीण होऊन जातं… बाबांना लिहिलेलं पहिलं non-academic पत्रं… डोळ्यात इतक्या सहजी पाणी आणत आजही… ती आई साठी लिहिलेली कविता… मैत्री तुटल्यावर कवितेत व्यक्तं केलेलं दुखः… बाजारात भाजी विकायला बसलेल्या लहान  मुलाच्या चेहऱ्यावर बघितलेली ती निरागसता, जी कागदावर अगदी सहज उतरत गेली… भावाने self motivation म्हणून लिहिलेली note (जी मला आयुष्यभर motivate करायला पुरेशी आहे )… बघून वाटतं किती मोठा ठेवा आहे आपल्याकडे …जो योग्य वेळी जपला नसता तर स्वतःचं किती मोठं नुकसान करून घेतलं असतं…

असाच  ठेवा जपत आणि समृद्ध करत रहायचंय…कायम…

माझ्या लेखणीला तलवारीची धार नाही देता आली तरी समयीच्या प्रकाशाची शुद्धता आणि प्रसन्नता लाभू दे - हीच ईश्वर चरणी प्रार्थना….


9 comments:

  1. nashibane evdhech upkar karave,
    sarva swapna tuzhe khare karave,
    Ankhi kahi maagni nasnar devakade,
    bas tula je have te nehmi tuzhya sobat asave.

    ReplyDelete
  2. Can't believe, ki ha tuza pahila lekh ahe....:) superlike
    Agdi lekhika aslyasarkh lihilay sagl:):) Dil ko chu gaya !!

    ReplyDelete
  3. Believe कर ग सोनल... तुझी room-mate असली तरी माझे हे 'गुण' तुला नसतिल ठाऊक ;)
    Btw, Thanks for your support! :)

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. Sundar, antarmanaat dadlela haa shabdancha samudra kasa sthiravlaa aahe yaa lekhaat. good start :)

    ReplyDelete
  6. तुझ्या मनाच्या अंतरंगात थैमान घालणाऱ्या भावना अतिशय प्रामाणिकपणे आणि उत्तमरीत्या शब्दांत उतरवल्या त्याबद्दल तुझं अभिनंदन!
    आणि तूच लिहिल्याप्रमाणे की,
    "पण त्यांना असं लेखणीत कैद केलं कि कधी कधी प्रेमात पडायला होतं या विचारांच्या…
    कधीतरी काहीतरी लिहिलेलं, नंतर कधीतरी वाचताना जी मजा येते, जे समाधान मिळतं ते शब्दात सांगणं कठीण होऊन जातं… … बघून वाटतं किती मोठा ठेवा आहे आपल्याकडे …जो योग्य वेळी जपला नसता तर स्वतःचं किती मोठं नुकसान करून घेतलं असतं…
    असाच ठेवा जपत आणि समृद्ध करत रहायचंय…कायम…"
    ही अनुभूती वारंवार मिळवण्यासाठी तुला स्वतःला अजून लिहित करायला हवं. त्यासाठी वेळात वेळ काढण्याचा प्रयत्न कर.
    तुझ्या लिखाणाच्या उत्तम गुणवत्तेबाबत शंका घेण्याचं काही कारणच नाही, तरी लिखाणाची हतोटी वारंवारच्या सरावानेच वृद्धिंगत होते. अधिकाधिक लिखाणाच्या सवयीने लेखकाची/लेखिकेची ते कसब, ती निपुणता अधिक वाढते हे निश्चित! त्यामुळे तू असेच लिहित राहावे, ही विनंती! धन्यवाद!

    ReplyDelete
  7. लिखाणाची हतोटी वारंवारच्या सरावानेच वृद्धिंगत होते - लाखात एक बोललास ...
    आणि असं लिहित राहिलं कि जे समाधान मिळतं ते तर शब्दा पलीकडच असतं .. तुझा सल्ला मनावर घ्यायला काहीच हरकत नाही :)
    प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार!

    ReplyDelete